मुंबई । बॉलिवूडची हवा-हवाई, अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना चटका लावून जाणारी होती. आज (२४ फेब्रुवारी) हा श्री देवींचा पहिला स्मृती दिन आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला.
श्रीदेवी या नेहमी कार्यक्रमात पाश्चिमात्य कपड्यांपेक्षा साडीमध्ये हजेरी नेसण्यास अधिक पसंत करत होत्या. त्याच्याकड सर्व पारंपारिक, आणि आधुनिक पद्धतीच्या साड्या आहेत. या सांड्यापैकी एका साडीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती
त्यातही त्यांची एक जांभळ्या रंगाची कोटा साडी ही त्यांची अतिशय आवडती होती. ही साडी त्यांनी अनेक वर्षं जपून ठेवली होती. त्यांच्या या साडीचा लिलाव करण्याचे त्यांचे पती बोनी कपूर यांनी ठरवले असून या लिलावातून मिळणारा पैसा चांगल्या कार्यासाठी वापरण्यात येणार आहे.
या साडीच्या लिलावातून येणारा पैसा कर्न्सन इंडिया फाऊंडेशन या संस्थेला देण्यात येणार आहे. हा लिलाव परिसेरा या वेबसाईटवर होणार असून त्यावर लाईव्ह अपडेट लोकांना कळणार आहेत. लिलावाची रक्कम ४० हजारापासून सुरू होणार आहे.श्रीदेवी मोहित मारवाहच्या लग्नासाठी गत वर्षी दुबईला गेल्या होत्या. त्यावेळी त्या जुमैरा एमिरेट्स टॉवरमध्ये राहात होत्या. याच हॉटेलमधील वॉशरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर डिनरला बाहेर जाणार असल्याने त्या आवरायला वॉशरूमला गेल्या होत्या. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे बोनी कपूर यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला.
श्रीदेवी या आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडला असता पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी त्यांना दिसल्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी श्रीदेवींना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.