HW News Marathi
मनोरंजन

सुपरस्टार राजेश खन्नांची १० सुपरहिट गाणी

मुंबई | बॉलिवूडवर अधिराज्य करणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज ७६ वी जन्मदिवस आहे. त्यांनी जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या आठवणी मात्र कायमचसोबत राहणार आहेत. ७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीला राजेश खन्ना नावाचं एक देखणं स्वप्न पडलं. चित्रपटाच्या नायकाचे सगळे ‘अंदाज’ बदलून टाकणाऱ्या या देखण्या हिरोला प्रेक्षकांचं अगदी ‘अमरप्रेम’ लाभलं. आराधना, कटी पतंग, आनंद अशा अजरामर कलाकृती साकारत राजेश प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत होऊन बसला.खन्ना यांचे ‘हाथी मेरे साथी’ ‘आराधना’, ‘इत्तेफाक’, ‘डोली’, ‘बंधन’, ‘दो रास्ते’, ‘द ट्रेन’, ‘सच्चा झूठा’, ‘सफर’, ‘कटी पतंग’, ‘आन मिलो सजना’, ‘आनंद’, ‘मर्यादा’,’अमर प्रेम’, ‘अंदाज’,’अपना देश’ आणि ‘दुश्‍मन’ हे चित्रपट खूपच लोकप्रिय झाले.

जसे त्यांचे चित्रपट हिट झाले तशीच त्यांच्यावरची गाणीही लोकप्रिय झाली. प्रेमगीतापासून ते अगदी आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गाण्यांपर्यंतची राजेश यांची गाणी लोकांच्या मनात ठसली. आजची तरुण पिढीही राजेश खन्ना यांची गाणी गुणगुणते. म्हणूनच कदाचित राजेश खन्ना यांना जाऊन 6 वर्षं झाली तरीही त्यांच्या नावाचं गारूड अजूनही प्रेक्षकांच्या मनावर तसंच आहे. सुपरस्टार राजेश खन्ना यांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या दहा अजरामर गाण्यांचे व्हिडिओ खास सामना ऑनलाईनच्या वाचकांसाठी देत आहोत.

1. ये रेशमी जुल्फें- चित्रपट दो रास्ते (1969)

2. रूप तेरा मस्ताना- चित्रपट आराधना (1969)

3. ओ मेरे दिल के चैन- चित्रपट मेरे जीवनसाथी (1972)

4. ये जो मोहोब्बत है- चित्रपट कटी पतंग (1971)

5. कोरा कागज था- चित्रपट आराधना (1969)

6. चिंगारी कोई भडके- चित्रपट अमरप्रेम (1972)

7. मेरे नैना सावन भादो- चित्रपट मेहबुबा (1972)

8. मेरे सपनोंकी रानी- चित्रपट आराधना (1969)

9. ये शाम मस्तानी – चित्रपट कटी पतंग (1971)

10. प्यार दिवाना होता है- चित्रपट कटी पतंग (1971)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२५ जानेवारीला ‘फक्त’ ठाकरे सिनेमाच झळकणार

News Desk

पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार विवेक ओबोरॉय

News Desk

आपल्या डोळ्यांची काळजी व्हॉट्सअॅप घेणार ?

News Desk