HW News Marathi
मनोरंजन

श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

मुंबई | मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाचे लेखन, निर्मिर्ती आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केले आहे. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विविधांगी भूमिका लीलया साकारणाऱ्या श्रीरंग देशमुख यांनी या चित्रपटाला दिग्दर्शकीय स्पर्श कसा दिला आहे हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘एक निर्णय’ स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आत्ताच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते तेव्हा समाज आणि कुटुंब तो स्वीकारतो का? ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

‘माणसाने आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयावर आयुष्याचं घडणं अथवा बिघडणं अवलंबून असतं. तो एक निर्णय माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो. याच अनुषंगाने एक कथा मी लिहिली, आणि आता ती ‘एक निर्णय’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ज्यांना आयुष्यात स्वतःसाठी एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्यांनी अजून तो घेतला नाही त्या सगळ्यांसाठीच हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल असा विश्वास श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केला.

या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत कुंजिका काळवींट हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे.

जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती सुरात बांधली आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडेंचं असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक याचं असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. राहुल खंडारे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट १८ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींच्या हत्येबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी

News Desk

जितेंद्र जोशींनी घेतला सचिन कुंडलकरांचा खरपूस समाचार

News Desk

जाणून घ्या… दिवाळीच्या फराळमधील ‘अनारसे’ सोप्या पद्धतीने कसे कराल  

swarit