HW News Marathi
मनोरंजन

‘मन्नत’ मध्ये दहीहंडी फोडल्या प्रकरणी शाहरुखविरुद्ध फतवा

मुंबई | बॉलिवूड किंग शाहरुख खान पुन्हा एकदा वादात अडकला आहे. यावेळी निर्माण झालेल्या धार्मिक वादात मुस्लीम उलेमांनी त्याच्याविरोधात फतवा जारी केला आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाहरुखने आपल्या मुंबईतील मन्नत या बंगल्यात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करत हंडी फोडली होती. या कार्यक्रमातले काही फोटोही त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. यानंतर अनेक मौलाना संतापले आणि त्यांनी शाहरुखविरुद्ध फतवा जारी केला.

शाहरुखने एक हिंदू सण साजरा केला, असा आक्षेप मौलांनी घेतला आहे. सोमवारी शाहरुखने मुंबईतल्या आपल्या ‘मन्नत’ या घरी पत्नी गौरी, मुलगा अबराम आणि फॅन्ससोबत दहीहंडी फोडली. यामुळे मौलाना नाराज झालेत. शरियतनुसार हे कृत्य अनैतिक आणि हराम असल्याचे म्हटले आहे. शाहरुख एक सेलिब्रिटी आहे, यामुळे कोणत्या धर्माचा सण कसा साजरा करावा याचे भान असणे त्याला आवश्यक आहे, असे ‘फतवा ऑन मोबाईल सर्व्हिस’चे चेअरमन मुफ्ती अरशद फारुकी यांनी म्हटले आहे. इतर धर्मातील सणांमध्ये सहभागी होणे वेगळी गोष्ट आहे. परंतु, गैर-इस्लामिक सण आपल्या घरी साजरा करणे आणि त्या धर्माच्या परंपरांचे पालन करणे इस्लाममध्ये योग्य नसल्याचे फारुकी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

News Desk

१४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला ‘माऊली’

News Desk