HW News Marathi
मनोरंजन

एसटीएफने ऊधळला सलमानच्या हत्येचा कट

मुंबई | बॉलीवुडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा धक्कादायक खुलासा गुरुग्राम एसटीएफच्या टीमने केला आहे. गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहरास अटक केली आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी मागण्याचे २४ पेक्षा जास्त गुन्हे हरियाणासह अनेक राज्यात दाखल आहे. अटकेनंतर एसटीएफने केलेल्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता अशी कबुली त्याने दिली आहे.

संपत नेहराने मुंबईतील वांद्रे येथील सलमानच्या घराची दोन दिवस रेकी केली होती. संपत नेहराने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलमानच्या घराची रेकी केली होती. संपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचे भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभे राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत्येचा मनसुबा संपतचा होता. एवढेच नाहीतर फॅन्स आणि सलमानमध्ये किती अंतर असते याचाही आढावा घेऊन गोळी झाडण्याचा संपतचा डाव होता. पण संपत आपल्या कटात यशस्वी होण्याआधीच एसटीएफच्या टीमने हैदराबादमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सेक्सचे चार लक्षणे

News Desk

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म दिवस 

News Desk

संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचे निधन

News Desk
महाराष्ट्र

भिडे गुरूंजींचे अजब वक्तव्य

News Desk

नाशिक | नाशिकमध्ये एका व्याख्यानात संभाजी भिडे गुरूंजींनी आंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले आहे. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते आणि आजपर्यंत १८० जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे गुरूजी यांनी केला आहे.

अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ असा करावा. सिंहासनाच्या रक्षणासाठी धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी ‘हिंदवी स्वराज्य खडा पहारा’ तुकडी तयार करण्याची घोषणा त्यांनी केली.

तसेच हिंदूंचे खरे शत्रू भारतातले सुशिक्षीतच आहेत असेही ते यावेळी बोलताना म्हणालेत. या सभेला परवानगी द्यायला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळे रविवारी कडकोट बंदोबस्तात ही सभा पार पडली. पण सभेच्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान या सभेत भिडेंनी कार्यकर्त्यांना व्यसनमुक्तीचीही शपथ दिली.

 

Related posts

चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याला ५० कोटी अतिरिक्त निधी देणार – अजित पवार

News Desk

पोलिस मेगा भरती करुन जखमेवर मीठ चोळत आहात का? नितेश राणेंचा सरकारला सवाल

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं घेतलं ‘हे’ महत्वाचं निर्णय

Aprna