Connect with us

मनोरंजन

असा आहे… मिस वर्ल्ड ऐश्वर्याचा प्रवास

Gauri Tilekar

Published

on

अश्विनी सुतार | सौंदर्याची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज (१ नोव्हेंबर) वाढदिवस. ऐश्वर्याचा जन्म दाक्षिणात्य कुटुंबात झाला मात्र ती मूळची मल्याळम आहे. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरमध्ये झाला. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यांनतर तिने आपली वेगळीच ओळख निर्माण केली. अगदी विश्वसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरविते. तसेच कान्स फेस्टिवलमध्ये देशाचे प्रतिनिधत्वी केले तर टाईम्सच्या मुखपृष्ठावर झळकण्यापर्यंतचा ऐश्वयार्चा प्रवास आहे. ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ होते. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा खिताब पटविला. तेव्हा तिने आर्किटेक्चर अभ्यासक्रमात तिने प्रवेश घेतला होता. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचे शिक्षण झाले. पुढे ऐश्वर्याचे आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात आकर्षक वाढले. या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वर्याला दुसरा क्रमांक मिळाला. पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर विश्वसुंदरीचा मुकूट तिच्या डोक्यावर चढला.

बॉबी देओलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. हम दिल दे चुके सनम, मग देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर हे चित्रपट विशेष गाजले. कान्सच्या चित्रपट महोत्सवात म्हणूनच ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे.

तरुणांना घायाळ करणारी ऐश्वर्या राय ही सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहे. १९९४ मध्ये ऐश्वर्या राय हि मिस वल्ड होती. त्यांनतर तिने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. बॉलीवूड मग हॉलिवूड आणि त्यांनतर अखेरीस तिचा चेहरा आंतराष्ट्रीय ब्रँड म्हणून बनला. आकर्षक निळ्या डोळ्यांचे तसेच तिच्या चालण्या-बोलण्याच्या अंदाजाचे सर्वच जण चाहते आहेत. मात्र एवढ्या बीजी शेड्युलनंतरही तिच्या सुंदर चेहऱ्याचे गुपित काय ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तिचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि नाजूक शरीरयष्टी पाहून ती आज वयाच्या ४५व्या वर्षात पदार्पण करतेय यावर विश्वासच बसत नाही.

मनोरंजन

‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही !

News Desk

Published

on

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमा २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. परंतु ठाकरे या सिनेमाला संभाजी ब्रिगेड या संघटनेने विरोध केला आहे. केवळ विरोध नव्हे, तर ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही, असा इशाराच संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कपिल ढोके यांनी दिला आहे.

‘ठाकरे’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रित केलेल्या दृश्यांवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून, ते दृश्य सिनेमातून तात्काळ वगळावे, अन्यथा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकी वजा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. अन्यथा महाराष्ट्रातल्या एकाही सिनेमागृहामध्ये हा सिनेमा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रदर्शित होऊ देणार नाहीत,असे ढोके यांनी सांगितले आहे.

 

 

Continue Reading

मनोरंजन

‘चुंबक’ ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा

News Desk

Published

on

पुणे | पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘चुंबक’ या सिनेमाला संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले.  संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ सिनेमाला हा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच  सौरभ भावे, संदीप मोरे यांना चुंबक सिनेमाच्या कथेसाठी उत्कृष्ट पटकथा पुरस्कार तर स्वानंद किरकिरे यांना चुंबक या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले होते.

धनंजय कुलकर्णी यांना दिथी उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार,  देविका दफ्तरदार यांना नाळ सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सुमित्रा भावे यांना दिथी सिनेमासाठी गौरविण्यात आले. प्रेक्षक पसंतीचा चित्रपट हा पुरस्कार सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठी या चित्रपटाला. तर जागतिक स्पर्धा विभागात उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार गर्ल्स ऑफ द सन या चित्रपटाला मिळाला.

Continue Reading
Advertisement

HW Marathi Facebook

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या