HW News Marathi
मनोरंजन

ही मॉडेल लग्न न करताच होणार आई

Kylie Jenner Travis Scott
Credit: Ethan Miller/Getty; Dimitrios Kambouris/Getty

वृत्तसंस्था: रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिची बहीण कायली जेनर सध्या गर्भवती असून, तीदेखील बहिणींप्रमाणेच लग्न न करता आई होणार आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल असलेली कायली बॉयफ्रेंड ट्रॅविस स्कॉट याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहते. परंतु कायलीचा ट्रॅविससोबत लग्न करण्याची सध्या कुठलाही विचार नाही. त्यामुळे ती अविवाहितपणातच आई होणार आहे.

वास्तविक कायली आणि ट्रॅविसला लग्नासाठी आणखी काही वेळ हवा आहे. आयएनएसने टीएमजेड वेबसाइटचा हवाला देताना म्हटले की, कायली आणि स्कॉटच्या जवळच्या सूत्रांनुसार, दोघांनाही असे वाटत आहे की त्यांनी अद्यापपर्यंत एकमेकांना पुरेसे समजून घेतले नाही. त्यामुळे विवाहाच्या बंधनात अडकण्याची त्यांना काहीही घाई नाही. सूत्रानुसार, दोघेही त्यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी सकारात्मकतेच्या शोधात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर मुंबई पोलिसांनी सलमान खानला शस्त परवाना केला जारी

Aprna

यंदाच्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या ही विशेष भेट

swarit

अनुपम खेर यांचा एफटीआयआयला रामराम

Gauri Tilekar