HW News Marathi
मनोरंजन

आज संगीतकार वसंत देसाईंचा स्मृतिदिन

संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म सावंतवाडी येथे ९ जून, १९१२ रोजी झाला. वसंत देसाई हे मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींमुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे.

घरात सांज-सकाळ होणार्‍या आणि गाव देवळात होणार्‍या भजन-कीर्तनांमुळे छोट्या वसंताला संगीतात रुची निर्माण झाली. त्यातच गावात एक सर्कस आली; ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद स्यावे असे वाटू लागले. त्यासाठी त्यांणी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले. सर्कसमध्ये काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती. गोविंदराव टेंबे संगीत देत होते. वसंत देसाईंनी त्यांचा साहाय्यक होण्याचे पत्करले. पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले आणि त्यांना मास्तर कृष्णराव व केशवराव भोळे यादोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, तान, फिरकी, आणि रसानुकृत भावदर्शन शिकले.

१९४३ मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२च्या चीन युद्धाच्या वेळचे ‘जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकरांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. २२ डिसेंबर १९७५ ला मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारवर टीका केल्यामुळे अमोल पालेकरांचे भाषण रोखले

News Desk

पोकळ धमक्या देणारा एक मुलगा

News Desk

#IndependenceDay : स्टार्ट-अप इंडियाचा नारा, भारताची एकता ही आपले संपत्ती !

News Desk