HW News Marathi
मनोरंजन

पंजाब एसआयटीकडून अक्षय कुमारची २ तास चौकशी

चंदीगड | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी शीख धर्मातील पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’चा अवमान केल्याप्रकरणी पंजाबच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोन तास कसून चौकशी केली आहे. एसआयटीने आज (२१ नोव्हेंबर)ला अक्षय यांना ४२ प्रश्न विचारण्यात आली. परंतु एसआयटीकडून लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी अक्षयला ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीम सिंग आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यात झालेल्या १०० कोटीच्या व्यवहारासंबंधी अक्षयला अनेक प्रश्न विचारण्यात आले.

‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीम सिंगचा ‘मेसेंजर ऑफ गॉड’ नावाचा एक सिनेमा सप्टेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु या प्रकरणात राम रहीमची निर्दोष सुटका झाली होती. या सिनेमा विरोधात पंजाबमध्ये प्रदर्शनाला विरोध करण्यात आली होती. सर्व विरोध डावलून हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला असून तेव्हाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या बैठकीत झाला होता. ही बैठक अक्षय कुमारच्या घरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अक्षयच्या अडचणीत सापडला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुखबीर सिंग बादल आणि अक्षय कुमार या दोघांना एसआयटीने चौकशीसाठी आज (२१ नोव्हेंबर)ला अक्षय एसआयटीसमोर हजर झाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांच्या ‘या’ आवडत्या साडीचा होणार लिलाव

News Desk

#HappyBirthdayLataDi | लतादीदी आयुष्यभर का राहिल्या अविवाहित ?

News Desk

#IndependenceDay : भ्रष्टाचार, हिंसाचार, जातीय-धार्मिक भेदभाव मुक्त देश !

News Desk