HW News Marathi
मनोरंजन

टॉयलेट’ने दोन दिवसांत कमावले ३० कोटी

मुंबई : एका प्रेमी युगुलाचा शौचालयासाठीचा संघर्ष दाखविणाऱ्या ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली आहे. केवळ दोन दिवसांत या सिनेमाने तब्बल ३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी १३.१० कोटी, तर दुसऱ्या दिवशी १७.१० कोटी रुपयांची कमाई केली. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला पाठबळ देणारी भूमिका मांडण्यात आल्यामुळे या सिनेमाचा प्रदर्शनापूर्वीच खूप गाजावाजा झाला होता. बॉक्स ऑफिसचा विश्लेषक तरण आदर्शने रविवारी टि्वटरवर म्हटले आहे की, ‘टॉयलेट- एक प्रेमकथा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. सिनेमाविषयी लोकांच्य प्रतिक्रिया चांगल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंगलाच निर्माते व दिग्दर्शकांमध्ये रंगले मानआपमान नाट्य

News Desk

आपल्या डोळ्यांची काळजी व्हॉट्सअॅप घेणार ?

News Desk

गुलमोहर फुलला

swarit