HW News Marathi
मनोरंजन

लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनोखा उपक्रम

मुंबई | आजकालच्या रॉक संस्कृतीमध्ये लोप पावत चालेली ‘लोककला’ जपण्यासाठी ठाण्यामधील बोईसर येथे लोककला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी कला म्हणजे लोककला. विविध क्षेत्रातील लोकांना ही लोककला शिकता यावी. त्यांनी ती आत्मसात करावी आणि त्याचा आनंद घ्यावा या साठी मनःज्योत प्रतिष्ठानने यंदाच्या सुट्टीमध्ये शिबीराचे आयोजन केले आहे. शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मन:ज्योत प्रतिष्ठान तर्फे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबीर हे सर्वांसाठी विनामुल्य असून दिनांक १६ मे ते २६ मे २०१८ दरम्यान आयोजित केलेल्या ह्या शिबिरामध्ये मुख्यत: तमाशा, भारुड, गोंधळ, पोवाडा आदी लोककलांचे प्रशिक्षण सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळात चिराग विद्यालय हॉल, शुक्ला कंपाउंड, बोईसर (प) येथे दिले जाणार आहे. लोककला प्रशिक्षण शिबीरात भाग घेण्यासाठी येणारा विद्यार्थी वय १२ ते वय वर्ष ६० या गटातला असावा आणि वरील लोककलामधील आवड अथवा जुजबी ज्ञान असावे. भारत सरकारचा “युवा प्रतिभा पुरस्कार” विजेते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अष्टपैलु पारंपारिक युवा लोककलावंत प्रशिक्षक प्रा. योगेश माणिकराव चिकटगावकर हे सदर शिबिराचे संचालक व प्रमुख मार्गदर्शक आहेत.

लोककला प्रशिक्षण शिबीराला महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलावंत प्रशिक्षक म्हणून आपले योगदान देणार आहेत. यामध्ये योगेश माणिकराव चिकटगावकर,विकास कोकाटे, हरेश तांबोळी, हेमंत तांबोळी, स्नेहा गायकवाड, हमीद सय्यद, प्रविण जाधव, अक्षय टाक, भाऊसाहेब मनाळ, कानिफनाथ बडे विकास नाईकरे, अपुर्वा दामले, इंद्रायणी बुधकर, ह्यांचा सहभाग असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

News Desk

सचिन च्या उपस्थितीत मनसेचा दीपोत्सव

swarit

या मकरसंक्रांतीला तुमच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा अन् वाढवा नात्यांमधील गोडवा

News Desk