HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षाचे होते. मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अनेक जाहिरातींमध्ये देखील त्यांनी काम केले. ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, या प्रसिद्ध मराठी चित्रपटांमधील किशोर प्रधान यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

किशोर प्रधान यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वि मेट’ सारख्या प्रसिद्ध हिंदी सिनेमामधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. एखाद्या चित्रपटामधली त्यांची कितीही छोटी भूमिका असो आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी ती भूमिका प्रसिद्ध केली. त्यांच्या अभिनयाला असलेली विनोदाची झालर हे त्यांचे विशेष कौशल्य ! किशोर प्रधान यांनी १०० हून अधिक मराठी चित्रपट तर १८ इंग्रजी नाटकांमध्ये काम केले आहे. किशोर प्रधान यांच्यासारख्या गुणी कलावंताच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिस इंडिया २०१८ स्पर्धेत मुंबईतील महिलेने मारली बाजी

News Desk

अंतराळाचे कुतूहल कलेतून मांडणारी पिंगळा मोरे ठरली ‘डुडल फॉर गुगल’ची विजेती

News Desk

Ganesh Chaturthi 2018 |रॉयलस्टोनमध्ये पंकजा मुंडेंनी केले बाप्पाचे थाटात स्वागत

Gauri Tilekar