HW News Marathi
मनोरंजन

नाना पाटेकरांनी का रद्द केली पत्रकार परिषद ?

मुंबई | ‘हॉर्न ओके प्लिज’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या गंभीर आरोपांवर नाना पाटेकर यांनी मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. नाना पाटेकर हे आज (8 आॅक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आपली भूमिका मांडणार होते. परंतु नाना पाटेकर यांनी ऐनवेळेस पत्रकार परिषद रद्द केल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते.

नाना पाटेकर यांच्या वकिलांकडून तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नाना पाटेकर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणूनच त्यांची आजची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द केली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना पाटेकर यासंदर्भात नक्की काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांच्या वकिलांकडून नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी आपल्याला नानांकडून अशी कोणतीही नोटीस आलेली नसल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. तसेच नोटीस नाही पण धमक्या मात्र मिळत आहेत असा आरोपही तनुश्रीने केला आहे. तसेच तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यासोबत ‘चॉकलेट-डीप डार्क सिक्रेट’ या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर देखील गैरवर्तवणुकीचा आरोप केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

News Desk

लवकरच रीगल सिनेमागृह बंद होणार

swarit

Gandhi Jayanti : भाजपच्या पदयात्रा मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी

swarit
राजकारण

राम मंदिर बांधण्यातील अडथळा नरेंद्र मोदीच | प्रवीण तोगडिया 

News Desk

नागपूर ।”अयोध्येत राम मंदिर बनवण्यामध्ये येणारा अडथळा नरेंद्र मोदीच आहेत,” असे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले आहेत. रविवारी (७ ऑक्टोबर ) संघभूमीत येऊन तोगडियांनी राष्ट्रीय स्वयंम संघ व नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र चालवले आहे. संघावर दबाव असल्यामुळे कुणीही राम मंदिराबाबत पुढाकार घेतला नाही. “माझ्यावर सुद्धा दबाब टाकण्यात येत आहे,” अशा प्रकारचा आरोप तोगडिया यांनी मोदींवर केला.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून २१ ऑक्टोबरला लखनौ ते अयोध्येपर्यंत शांतिपूर्व यात्रा काढण्यात येणार आहे. देशातून वेगवेगळ्या भागातून रामभक्त या यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रवीण तोगडिया या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. “३२ वर्षांपासून संसदेत कायदा तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु वारंवार आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. सत्तेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघच महत्त्वाची भूमिका आहे. तरीही राम मंदिराबाबत निर्णय घेता येत नाही. संघाने लवकरात लवकर संसदेत कायदा तयार करण्याचे आदेश द्यावे”, असे ही तोगडिया यांनी सांगितले आहे.

प्रवीण तोगडियांनी म्हणाले की, “शिवसेनेचे आम्ही समर्थन करू तसेच शिवसेनेवर हिंदूंनाही पूर्ण विश्वास आहे. पक्षप्रमुखांनी राम मंदिर उभारण्या बाबत ठोस भूमिका घ्यावी अयोध्येकडे कूच करावे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे.”

Related posts

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या लढती

News Desk

भटिंडामधील मतदान केंद्रावर गोळीबार

News Desk

गरीबांचा विचार भाजप करत नाही | उद्धव ठाकरे

News Desk