HW News Marathi
मनोरंजन

विंकवर 2018 मध्ये लोकप्रिय ठरलेल्या मराठी गाण्यांची यादी जाहीर

मुंबई | मुंबईत आपल्या अ‍ॅपवर सर्वाधिक ऐकल्या जाणाऱ्या गाण्यांची यादी विंकने जाहीर केली असून 2018 सालातील ही सर्वाधिक वाजवली गेलेली 10 मराठी गाणी आहेत. स्ट्रीमिंगचे हे ट्रेण्ड्स मुंबईतील लाखो लोकांची निष्पक्ष आणि खरी निवड दर्शवतात.

Most Streamed Songs in Mumbai on Wynk In 2018
Songs Album Artists
Dilbar Satyameva Jayate Dhvani Bhanushali, Neha Kakkar, Ikka
Tareefan Veere Di Wedding Badshah
Buzz Buzz Aastha Gill, Badshah
Kar Har Maidan Fateh Sanju Sukhwinder Singh, Shreya Ghoshal
Bom Diggy Diggy Sonu Ke Titu Ki Sweety Jasmin Walia, Zack Knight
Daru Badnaam Daru Badnaam Kamal Kahlon, Param Singh
Halka Halka Fanney Khan Divya Kumar, Sunidhi Chauhan
Dil Diyan Gallan Tiger Zinda Hai Atif Aslam
Shape Of You Shape Of You Ed Sheeran
Milegi Milegi Stree Sachin Jigar, Mika

Most streamed Marathi songs on Wynk in 2018
Songs Album Artists
Jau De Na Va Naal Jayas Kumar
Zingaat Sairat Ajay-Atul
Devak Kalji Re Redu Ajay Gogavale
Yaad Lagla Sairat Ajay Gogavale
Sairat Zaala Ji Sairat Chinmaya Sripada/Ajay Gogavale
Apsara Aali Natarang Ajay-Atul
Aatach Baya Ka Baavarla Sairat Shreya Ghoshal
Hey Bappa Morya Hey Bappa Morya Marathi Adarsh Shinde
Jeev Rangla Jogwa Shreya Ghoshal/Ajay-Atul/Hariharan
Tu Jarashi What’s Up Lagna Hrishikesh Ranade/Nihira Joshi Deshpande

2014 साली एक ओटीटी अ‍ॅप म्हणून सुरु करण्यात आल्यानंतर विंक म्युझीक अ‍ॅप हे देशातील सर्वाधिक सक्रिय युजर्स असणार्‍या म्युझीक अ‍ॅप्सपैकी एक म्हणून ओळखले जाते. स्मार्टफोन्स आणि हाय स्पीड डेटा नेटवर्कच्या अधिक प्रसारामुळे विंक म्युझीकचे देशात 100 मिलियनहून अधिक इनस्टॉल्स नोंदवण्यात आले आहेत. एअरटेलचे म्युझीक स्ट्रिमिंग अ‍ॅप विंक म्युझीकला नुकताच 2018 मधील गुगल प्ले स्टोअरचे सर्वाधिक मनोरंजक अ‍ॅप म्हणून रेट करण्यात आले आहे.

विंक म्युझीकची हंगामा, युनिवर्सल म्युझीक, सोनी म्युझीक, सारेगमा, झी म्युझीक, आदित्य म्युझीक, युनीसीस, व्हिनस, पीडीएल यासारख्या सर्व आघाडीच्या रेकॉर्ड कंपन्यांशी भागिदारी असून युजर्सना सर्वोत्तम आणि वैविध्यपूर्ण मनोरंजन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगीतप्रेमी लोक संगीत स्ट्रीमिंग अपवरून केवळ इंग्रजी गाणी ऐकणेच पसंत करतात, या समजाला हे वास्तव छेद देत असून नॉन-इंग्लीश प्रादेशिक गाण्यांची पसंती 100 टक्के मूल्यांकनासह वाढली आहे.

भारती एअरटेलच्या कंटेंट आणि अ‍ॅप्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बत्रा म्हणाले, “आम्ही आता आमच्या लायब्ररीमध्ये प्रादेशिक संगीत कंटेंट समाविष्ट करण्यासही प्राधान्य देत आहोत. याचे कारण म्हणजे आमचे बहुतेक नवीन युजर्स हे लहान शहरे आणि गावांचे प्रतिनिधीत्व करत असतात. त्यामुळेच सध्या विंक म्युझीकवर मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक भाषेतील गाणी स्ट्रीम होताना दिसत आहेत. पुढील काही वर्षांत हा ट्रेंड आणखी अधोरेखीत होण्याची शक्यता आहे. एअरटेलला बाजारपेठेची आणि ग्राहकांची चांगलीच जाण असल्यामुळे आम्ही युजर्सना सर्वोत्तम अनुभव मिळवून देण्यात यशस्वी होतो.”

म्युझिक स्ट्रीमिंग उद्योगक्षेत्रासाठी 2018 हे आणखी एक महत्वाचे वर्ष ठरले आहे. किफायतशीर स्मार्टफोन्सच्या सहज उपलब्धतेमुळे आणि स्वस्त डेटा प्लान्स व विस्तीर्ण 4जी नेटवर्कमुळे, स्मार्टफोन्स आणि म्युझिक अ‍ॅप्स आता संगीतप्रेमींसाठी फारच महत्वाची गरज ठरले आहेत. यातून त्यांना व्यक्तीगत अनुभव मिळतो. आज विंक म्युझिकतर्फे दर महिन्याला 1.5 बिलियन गाणी स्ट्रीम केली जातात आणि यात विशेष म्हणजे छोट्या शहरांतील व गावांतील स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून प्रादेशिक संगीताला जास्त पसंती दर्शवली जाते हे दिसून येते.

2019 मध्येही हा ट्रेण्ड अधिक वाढणार असल्याचा आमचा अंदाज असून यामुळे विविध स्ट्रीमिंग व्यासपिठांची संख्याही वाढू शकते. यातून प्रादेशिक व लहान कलाकारांनाही मोठ्या संख्येतील श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असून प्रादेशिक संहितेलाही यात अधिक वाव मिळू लागला आहे. दीप क्युरेशन आपल्या संहिता भागीदारांसह चांगले काम करीत आहे. यामुळे संगीतप्रेमींची निवड ओळखण्यासाठी आम्हाला मदत होत असून या व्यासपिठावर अधिकाधिक रसिकांना आकर्षून घेण्यासाठीही हा मार्ग उपयुक्त ठरतो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

News Desk

Kargil Vijay Diwas : राज्यातील ३०० चित्रपटगृहात युवकांसाठी ‘उरी’चे फ्री शोज  

News Desk

#GaneshChaturthi : जाणून घ्या…श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त

News Desk