HW News Marathi
मनोरंजन

अक्षयने खरेदी केले 18 कोटींचे अलिशान घर

अभिनेता अक्षय कुमारने 18 कोटी रुपये किमतीचे अलिशान घर विकत घेतले आहे. यापूर्वी अक्षय कुमारने मुंबईत अनेक ठिकाणी महागडे घर खरेदी केलेले आहेत. त्याच्या संपत्तीत आणखी एका अलिशान फ्लॅट्सची भर पडलीय.

अक्षयने १ नोव्हेंबरला अंधेरीतील न्यू लिंक रोडवर असलेल्या ट्रान्सकॉन ट्रायम्फ नावाच्या ३८ मजली इमारतीतील २१व्या मजल्यावर ४ फ्लॅट्स खरेदी केले आहेत. प्रत्येकी २,२०० चौरस फुटांचे हे फ्लॅट असून ते अक्षय भाटियाच्या म्हणजे अक्षय कुमारच्या नावावर आहेत. या फ्लॅटची किंमत प्रत्येकी साडेचार कोटी इतकी आहे. याबाबत विचारणा केली असता, अक्षय कुमार किंवा ट्रान्सकॉन डेव्हलपर्सपैकी कोणीही काहीही उत्तर दिले नाही. अक्षय सध्या पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांच्यासह जुहू येथे एका अलिशान घरात राहतो. या राहत्या घराशिवाय त्याचा वांद्र्यात एक ड्युप्लेक्स फ्लॅट, लोखंडवालामध्ये एक मोठा फ्लॅट आणि गोव्यात पोर्तुगीज पद्धतीचा एक व्हिलादेखील आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे गजक

News Desk

Kargil Vijay Diwas : सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करून देतो !

News Desk

#IndependenceDay : भ्रष्टाचार, हिंसाचार, जातीय-धार्मिक भेदभाव मुक्त देश !

News Desk