HW Marathi
HW एक्सक्लुसिव

Ajit Pawar And Pandurang Barora | पांडुरंग बरोरा, तुझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं असेलं..


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेते,आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. नुकताच राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बरोरा यांना आपल्या गोटात सामील करत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सेनेने धोबीपछाड दिला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असताना एक आमदार फुटला, तर पक्ष संपत नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना नव्याने तयार करून येत्या विधानसभेत शहापूरमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार निवडून आणा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.बरोरा जाण्याने शहापुरात राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी पवार यांनी बुधवारी शहापूर येथे राष्ट्रवादीचा मेळावा घेतला. यावेळी सरकारमुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. #AjitPawar #PandurangBarora #NCP #Shivsena

Related posts

Eknath khadse | एकनाथ खडसेंसह अनेक भाजप नेते कॉंग्रेसमध्ये येतील..

Arati More

संजय दिना पाटील आणि मनोज कोटक च्या विरोधात तृतीयपंथी उमेदवार

धनंजय दळवी

दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात दिव्यांग उमेदवार

धनंजय दळवी