HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Budget 2020 | अर्थसंकल्प कसा तयार केला जातो ?

दिल्ली | भारताची अर्थव्यवस्था हि जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. दरवर्षी अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतात , यामध्ये आपल्यासाठी काय खुशखबर असणार याची उत्सुकता देशातील प्रत्येक व्यक्तीला असते . येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमण या मोदी सरकार २.० चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प तयार कसा केला जातो , जाणून घ्या ..

अर्थसंकल्प निर्मितीचे महत्वाचे टप्पे

१) सर्वसाधारण ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरूवातीस अर्थसंकल्पाची प्रक्रिया सुरू होते. अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी देशाचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या विभागावर म्हणजे डिविजन ऑफ इकोनॉमिक अफेयर्सवर असते. यामध्ये सर्व केंद्रीय मंत्रालये, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था आणि भारतीय सैन्याचा समावेश आहे. अर्थसंकल्पामध्ये चालू अर्थसंकल्पाचा सुधारित अंदाज आणि पुढील आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रक तयार केला जातो.

२)पुढच्या टप्प्यात सर्व मंत्रालये आपापल्या अर्थसंकल्पांवर नीती आयोगाशी चर्चा करतात. यात सुधारित, अंदाजित आणि वास्तविक डेटावर चर्चा केली जाते. या संपूर्ण चर्चेनंतर अर्थसंकल्प हा निधीच्या उपलब्धततेच्या आधारे तयार केला जातो. जानेवारीमध्ये चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक निश्चित केले जाते आणि पुढील वर्षाच्या खर्चावर लक्ष केंद्रित केले जाते .

३) शेवटच्या टप्प्यात मंत्रालय, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाना माहिती देण्यात येते. काही वाद- विवाद असतील तर मंत्रिमंडळ ते सोडवण्याचे काम करते .

४)अंतिम टप्प्यातील अर्थसंकल्प विभाग या अर्थसंकल्पाची तयारी करतो. अर्थसंकल्पावर अर्थमंत्री आणि राष्ट्रपतींकडून मान्यता घेतली जाते . आणि सगळ्यात शेवटी हा तयार केलेला अस्र्थसंकल्प अस्र्थमंत्री अधिवेशनात मांडतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी लक्षात ठेवावं की ते ‘केंद्र सरकारचे नोकर नाहीत तर घटनेचे प्रमुख आहेत’ – घटनातज्ञ उल्हास बापट

Arati More

माझं रक्त उसळतं पण शेतकऱ्यांसाठी आज संसदेत मी नाहीये याची खंत वाटते -राजू शेट्टी

swarit

Pankaja Munde Exclusive | लाॅकाडऊन वाढणारच… धनंजय मुंडेंचं कौतुक नाहीच !

Arati More