मुंबई | दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (२३ सप्टेंबर) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात महाराष्ट्र पोलीस आणि महापालिकांनी जय्यत तयारी केली आहे. गणेश विसर्जनासाठी जवळपास तीन हजार वाहतुक पोलीस, स्वयंसेवक वाहतुकचे नियमन करण्यासाठी मुंबईत तैनात करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीवर विदेशी पाहुण्यांसाठी विशेष मंडप, चौपाटीवर विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यंदा निलांबरी बसची सोय देखील करण्यात आली आहे.
जेलीफीशची दहशत कायम
मुंबईच्या चौपाट्यांवर ब्ल्यू बॉटल जेलीफीश, स्टिंग रे, जेलीफीश आणि इल अशा प्रकारच्या उपद्रवी जलचर प्राण्यापासून सावधान राहा, असे संदेश देणारे फलक पालिकेच्या वतीने ठीक ठिकाणी लावण्यात आले आहे. भाविकांना विषारी जेलीफीशचा दंश होऊ नये. तसेच दंश झालाच तर तातडीने उपचार करण्यासाठी पालिकेच्या वतीने चौपाट्यावर प्राथिमक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. दंश आणि अन्य कोणत्या प्रकारच्या आरोग्य समस्याचा येथे मोफत स्वरुपात प्रथमोपचार केले जाणार आहे. गणेश भक्तांना पालिकेने पाण्यात जाण्यास सक्त मनाई केली असून यासाठी दोन ऐवजी चार बोट चौपाटीवर विसर्जन बोट ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस, वाहतुक पोलीस, जीवनरक्षक, एनडीआरएफ जवान तैनात आहेत.
विसर्जनासाठी रस्ते वाहतुकीत बदल
गणेश विसर्जनसाठी मुंबईत आज ठीक ठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती बाप्पाचे विसर्जनाला सुरुवात झाली आहे. वाहतुक कोंडी होऊ नये. यासाठी वाहतुक पोलिसांनी मुंबईतील ५३ रस्ते बंद ठेवले असून ५६ रस्ते एक मार्गी म्हणजे (वन वे) केले आहेत. काही मार्गांना पर्यायी मार्गही देण्यात आली आहे. जेणे करुन वाहनचालकांना नियोजन करता येईल आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही.
गिरगाव चौपाटीवर छायाचित्रणास बंदी
गिरगाव चौपटीवरील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोच्या संख्यने भाविक गर्दी करतात. भाविक या क्षणांची आठवण म्हणून कॅमेऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ काढतात. हा सोहळा मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी जणून भाविकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. बाप्पासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.
तसेच विसर्जित मुर्तीच्या फोटोमुळे गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या जाण्याच्या भीती असते. त्यामुळे विसर्जित मुर्तीचे फोटो मोबाइलद्वारे काढण्यास किंवा छायाचित्रण करण्यास भाविकांना महाराष्ट्र पोलीस आणि पालिकेने बंदी घालण्याचा निर्णय घेला आहे. तरी देखील कोणी असे करताना दिसल्यास त्या व्यक्तीचा मोबाईल जप्त होण्याची शक्यता आहे.