मुंबई | देशभरात जल्लोषात बाप्पाचे काल (२ सप्टेंबर) आगमन झाले. राज्यात आज (३ सप्टेंबर) दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज समुद्रात वेगवेगळ्या वेळी भरती येणार आहे. यामुळे गणेश भक्तांना भरतीच्या वेळेचा अंदाज घेऊन बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Dear Mumbaikars,
While bidding your favourite Bappa an emotional adieu, please do keep your safety in mind & note the tide timings while going for immersion to the sea/creeks.#Ganeshotsav2019#GaneshImmersion pic.twitter.com/bgjtItif3d
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 3, 2019
मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून भरतीचे सविस्तर वेळापत्रक पोस्ट केले आहे. मुंबईकरांनी अत्यंत सुरक्षितपणे त्यांच्या लाडक्या बाप्पाला मनोभावे निरोप द्यावा. आणि बाप्पाला निरोप देताना मुंबईकरांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीव मुंबई पोलिसांनी गिरगाव, दादर चौपाटी, चुहू चौपाटी आदी ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.