HW News Marathi
मनोरंजन

#GaneshChaturthi : गणरायाचे उत्साहात आगमन

मुंबई | मंगलमूर्ती श्री गणेशाच्या आगमनाला आज (२ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. देशात आर्थिक मंदीचे आणि पुराचेही पडसाद यंदाच्या गणेशोत्सवावर उमटले असले तरी चैतन्य घेऊन येणाऱ्या या बुद्धीच्या आणि कलेच्या देवतेचे स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. राज्यभरात मोठ मोठ्या मंडळांनी बाप्पाची मिरवणूक काढत, ढोल-ताशांच्या गजरात काल (१ सप्टेंबर) बाप्पाच्या आगमन झाले आहे. आज घरगुती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.

आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढील दहा दिवस मुंबई गजबजलेली राहील. काही मोठ्या गणपतींच्या दर्शनासाठी आजपासूनच रांगा सुरू होतील, तर गौरी आणि सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील देखावे पाहण्यासाठी भाविकांची मंडपांमधील गर्दी वाढू लागेल.

रविवारी दिवसभर पावसाची संततधार असल्याने बाप्पाच्या स्वागतालाच जणू पाऊस परतला, अशी भावना गणेशभक्तांनी व्यक्त केली. पावसामुळे चिखल, वाहतूककोंडीमध्ये वाढ अशा समस्यांना गणेशभक्तांना सामोरे जावे लागले, तरी गणेश आगमनाच्या उत्साहापुढे या समस्या गौण ठरल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सवाई एकांकिका स्पर्धेत औरंगाबादची ‘मॅट्रिक’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

News Desk

माझ्या आठवणीतील दिवाळी | Nilay Ghaisas

News Desk

जाणून घ्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या चित्रपटाचे किती होते मानधन

News Desk