नवी दिल्ली | यंदा मकरसंक्रातीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यासाठी देशात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान १५ जानेवारीला आहे. त्यासाठी करोडो भाविक प्रयागराज येथे दाखल होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. साधू-संताचे विविध आखाडे सुद्धा या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी हजारो तंबू उभारण्यात आले आहे. या तंबूचे एक वेगळे शहरच या ठिकाणी वसविण्यात आल्याचा भास होत आहे. देशभरातून भाविकांचा ओढा प्रयागराजकडे सुरु झाला आहे. दुसरीकडे प्रशासनाकडूनही जय्यत तयारी केली जात आहे.
Prayagraj: Visuals of a 'Lost and Found' centre set up at #KumbhMela2019. 15 such centres have been installed. A mobile application has also been developed. pic.twitter.com/M1NhdzGN2U
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 12, 2019
Lost and Found नावाचे विशेष सेंटर
कुंभमेळ्याबद्दल अशी एक धारणा आहे की, इथे लोकं हरवतात. मात्र आता ही गोष्ट जुनी झाली आहे. तरी या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता तुम्ही जर कुंभमेळ्यात जाण्याच्या विचारात असाल तर आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर तुमची काळजी दूर करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी येथे अशा परिस्थीतीचा सामना करण्यासाठी आणि हरवलेल्या भाविकांना त्यांच्या परिवाराची पुन्हा भेट घालून देण्यासाठी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात लॉस्ट आणि फाऊंड नावाचे एक सेंटर तयार करण्यात आले आहे. जे पूर्ण वेळ इथे आलेल्या भाविकांच्या मदतीसाठी तत्पर असेल. एक दोन नव्हे तर जवळपास अशी १५ सेंटर्स या ठिकाणी उभारण्यात आले आहे. जे हरवलेल्यांना शोधण्यात भाविकांची मदत करणार आहे. यासाठी एक मोबाइल ऍपसुद्धा तयार करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.