HW News Marathi
मुंबई

National Youth Day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई | राष्ट्रीय युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती होय. स्वामी विवेकानंदांनी युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती असा संदेश दिला आहे. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजासाठी योगदान देण्याचा उद्देशाने मुंबईतून वांद्रे स्थानकाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात ३५ युनिट रक्त गोळा करण्यात तरुणांना यश आले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी सभासद यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे. सरकारी सायन येथील रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिरामध्ये विविध महाविद्यालयाच्या माजी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विद्यार्थ्यांचा सहभाग या रक्तदान शिबीर भरविले होते.

या रक्तदान शिबिरादरम्यान प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र, भेटवस्तू देण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक तरुणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. “राष्ट्रीय युवा दिनी म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना मानवंदना देण्याचा आमचा दरवर्षी प्रयत्न असतो”, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. “यंदा या शिबिराचे तिसरे वर्ष होते. आम्हाला चांगल्या प्रमाणात यश लाभले याचा आनंद आहे”,अशी प्रतिक्रिया आयोजक विद्यार्थी यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dongri Building Collapsed : ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त निलंबित

News Desk

दारू बंदीच्या विषयावरून विधानसभेत गदारोळ

News Desk

एकबोटेंच्या जामिनाला आव्हान

News Desk