लखनौ | २०१९ मध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्याच्या नियोजनात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: लक्ष घातले आहे. उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध जिल्ह्यांपैकी एक अलाहाबादचे नामांतर करण्यात येणार आहे. कुंभमेळा गंगा-यमुनेच्या संगमासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अलाहाबाद’चे नाव बदलून ते ‘प्रयागराज’ करण्याचा विचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे. या निर्णयास उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाइक यांचीही मंजुरी मिळाली असा दावा योगींनी केला आहे. पुढील वर्षी पार पडणाऱ्या कुंभ मेळा निमित्त त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, कुंभ मेळ्याच्या आयोजनाचे कार्य सुरू असून डिसेंबरपर्यंत सर्वच कामे पूर्ण होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आदित्यनाथ दोन दिवसांपासून अलाहाबादमध्ये तळ ठोकून आहेत. येथील परिस्थितीचा ते स्वत: आढावा घेत आहे. कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांनी येथील संतासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी परिषदेत सांगितले की, कुंभ मेळ्याची तयारी समाधानकारक पद्धतीने सुरु असून सरकार ३० नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील . कुंभमेळ्यासाठी १ लाख २२ हजार शौचालये तयार केली जाणार आहेत.
कुंभमेळ्यादरम्यान लोकांना स्वच्छ भारताचा संदेश दिला जाणार आहे. या कुंभमेळ्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या ४४३ योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रत्येक कामाचा कालावधीही निश्चित झाला आहे. कुंभमेळाव्यातील कामाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याचे निमंत्र मोदी यांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती योगींनी दिली आहे.
प्रयागराज नावास राजपालांचा पठिंबा…
अलाहाबाद येथील विश्राम भवनात पत्रकारांशी संवाद साधताना योगी यांनी सांगितले, की “कुंभमेळ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये अखाडा परिषद आणि इतर संस्था, संघटनांनी अलाहाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावास राज्यपाल राम नाइक यांनी आपली मंजुरी दिली आहे.” यापुढे ते म्हणाले, “या नामांतर प्रस्तावाला आमचा देखील पाठिंबा आहे. त्यानुसार, लवकरच अलाहाबादचे नाव प्रयागराज असे केले जाणार आहे.” सुत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ आपल्या आगामी बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देणार आहे.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath hinted that if a broad consensus is achieved, 'Allahabad will be renamed as Prayagraj.'
Read @ANI Story | https://t.co/tcYJvbGIT7 pic.twitter.com/WUVvI7cMoG
— ANI Digital (@ani_digital) October 13, 2018
More than 1,22,000 toilets will be installed for 2019 Allahabad Kumbh. We want to spread the message of Swachh Bharat during Kumbh : UP Chief Minister Yogi Adityanath pic.twitter.com/JaJxW4IRPr
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 14, 2018
Preparations for 2019 Allahabad Kumbh have been satisfactory so far. We will finish all the preparations by 30th November this year: UP chief Minister Yogi Adityanath pic.twitter.com/DjdEdfvcBA
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 14, 2018
२०१९ कुंभमेळ्यातील शाहीस्नान
१४-१५ जानेवारी २०१९ : मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान)
२१ जानेवारी २०१९ : पौष पोर्णिमा
३१ जानेवारी २०१९ : पौष एकादशी स्नान
०४ फेब्रुवारी २०१९ : मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दूसरं शाही स्नान)
१० फेब्रुवारी २०१९ : वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान)
१६ फेब्रुवारी २०१९ : माघी एकादशी
१९ फेब्रुवारी २०१९ : माघी पोर्णिमा
०४ मार्च २०१९ : महाशिवरात्री
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.