HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

पवारांना सांगा आमचे सरकार येणार !

पूर्ण | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळती सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्षाची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे बालेले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमधील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हटले की, “राज्यात परत आपलेच सरकार येणार आहे. पवारांना सांगा आमचे सरकार येणार आहे,” असा दावा त्यांनी केला.

राज्यात आपलेच सरकार येणार आहे. येणार आहे की नाही? असा प्रश्न यावेळी चंद्रकांत पाटलांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिल्यावर, मग जरा हे पवारांना सांगा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. शरद पवार अजूनही विधानसभा जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र केंद्रात सत्ता स्थापनेनंतर राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मी बारामतीला वेळ देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने अशी लढत दिली होती की, शरद पवार यांना बारामतीच्या निकालाची शाश्वती नव्हती. निकालात काही गडबड होते का ? अशीच शंका त्यांना होती. पवारांना सुप्रिया सुळे जिंकतील याची खात्री नव्हती. लोकसभा निवडणुकीत आपण थोडे मागे पडलो, असे म्हणत आपण यात नाउमेद न होता कुठे कमी पडलो याचा अभ्यास केला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडेंनी घेतली उदयनराजेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

पंतप्रधान मोदी आज महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिकात

News Desk

…पण मी कधीही तुरुंगात गेलो नाही, पवारांचा शहांना टोला

News Desk