इंदापूर | काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. हर्षवर्धन पाटील उद्या (११ सप्टेंबर) दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. गेले काही दिवस हर्षवर्धन पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा होती.
गेल्या आठवड्यात पाटील यांनी पाटील यांनी ४ सप्टेंबर कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. त्यावेळी पाटील बोलताना म्हणाले की, आता अन्याय सहन करणार नाही, असे म्हणत भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. इंदापूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत तिढा निर्माण झाला होता. तर ही जागा राष्ट्रवादी आपल्याकडेचे ठेवणार अशी दाट शक्यता होती.
फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचे नाही – पाटील
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील म्हणाले की, “लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचे नाही. आघाडीची बैठक झाली जुन्नरची जागा सुटली तर इंदापुरची जागा का सुटली नाही? त्यामुळे आता निष्ठावान आणि प्रामाणिक माणसांसाठी काम करायचे आहे. प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला. सभ्यपणाचा राष्ट्रवादीकडून गैरफायदा घेण्यात आला असा आरोप त्यांनी केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.