HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याला शिवसैनिकांचा विरोध

श्रीरामपूरम | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसणार आहे. श्रीरामपूर येथील विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा शिवसेनेत प्रवेश केला आहे. कांबळेंच्या प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांनी नाराजीचा सूर आवळला आहे. कांबळे यांच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी करण्यात आले आहे. कांबळेंविरोधात केलेल्या बॅनरबाजीमध्ये म्हटले की, “‘सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, थोरात यांना फसवणाऱ्या गद्दार व बिनकामाच्या आमदाराला पाडायचे,” असा मजकूर बॅनरमध्ये लिहिला असून हे सर्व बॅनर शहरभर लावण्यात आले आहेत.

यापूर्वी ससाणे,विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून कांबळेंची ओळख होती. विखेंच्या भाजप प्रवेशानंतर कांबळेंनी बाळासाहेब थोरात यांचा हात धरला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात काँग्रेसमधून शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या आधी कांबळे यांनी शिवसेने प्रवेश केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती

News Desk

आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून आम्ही युतीच्या भानगडीत पडणार नाही !

News Desk

बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही !

News Desk