HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव आज हाती शिवबंधन बांधणार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव आज (१३ सप्टेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांच्या पाठोपाठ देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. जवळपास १५ वर्षं शिवसेनेपासून लांबानंतर भास्कर जाधव स्वगृही परतणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती आज दुपारी २ वाजता भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

१९८२ मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले. १९९५ ते २००४ या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदेही भूषवली. २००४ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. यानंतर २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार उतरले. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

२००९ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. जाधव यांच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठकाही झाल्या होत्या. भास्कर जाधव हे आज याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. जाधव यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील सेनेत प्रवेश करणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, आदेश द्यायचा !

News Desk

उदयनराजे भोसलेंना धक्का, सातारा लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर

News Desk

पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk