HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राधाकृष्ण विखेंनी आम्हाला वाट दाखवली | मधुकर पिचड

मुंबई | राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला वाट दाखविली, त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी भाजप प्रवेश करताना म्हणाले आहे. मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड आज या दोन्ही पिता-पुत्रांनी आज (३१ जुलै) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मधुकर पिचड म्हणाले की, “राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला वाट दाखविली, त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो.” राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे समर्थक मधुकर पिचड मानले जात होते.

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबईतील गरवारे क्लब आज (३१ जुलै) सकाळी ११ वाजताच्या सुमारास सर्वांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या उपस्थिती यांचा भाजप प्रवेश झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, आदेश द्यायचा !

News Desk

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी ‘या’ कारणामुळे अनुपस्थित

News Desk

‘मी पस्तावतोय’ मुख्यमंत्र्यांविरोधात कोल्हापुरात पोस्टरबाजी

News Desk