मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. उदयनराजे १ सप्टेंबरला रोजी मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे.
शिवप्रतिष्ठ हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज (३० ऑगस्ट) उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवास्थानी जाऊन त्यांनी भेट घेतलीय. या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आमची ही भेट राजकीय भेट नसून घरगुती असल्याचा उदयनराजेंनी सांगितले आहे. भिडे गुरुजी ही घरातली व्यक्ती असल्याचे यावेळी उदयनराजे यांनी म्हटले. दरम्यान उदयनराजेंनी ‘मला तर आता असे वाटतेय की राजकारणातूनच अलिप्त व्हावे, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे उदयनराजेंच्या मनात नेमके या सुरू आहे. तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.