HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा आजचा मुहूर्त टळला

मुंबई। शिवसेना-भाजपची घोषणा आज (२४ सप्टेंबर) होणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, युतीची घोषणा होण्याचा आजचा मुहूर्त टळला असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे युतीचे घोंगड अजून काही दिवस भिजत पडणार आहे. १० जागांमुळे युतीचे घोडे अडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (२३ सप्टेंबर) वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही.

दोन्ही पक्षांतील बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचे मुख्य कारण आहे. युती नाही झाली तर दोन्ही पक्षातील इच्छूक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाल्यास एका पक्षातील इच्छूक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नाराजीनाट्य, बंडखोरी किंवा पक्षांतरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते. या चर्चेचा तपशील राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिला जाईल. मात्र आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शाह घेणार आहे..

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुखांची भेट

News Desk

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो !

News Desk

बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे !

swarit