HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकणारी तरुणी ‘स्वाभिमानी’ची कार्यकर्ता

अहमदनगर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज (१३ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर एका तरुणीने शाईचा फुगा फेकल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार महाजनादेश यात्रेच्या अकोले येथे घडली असून हा तरुणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती असल्याचे म्हटले जाते.

“राष्ट्रवादी सोडून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मधूकर पिचड यांना उमेदवारी देऊ नये, सरकारचे महापोर्टल बंद कराव आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी या तुरुणींने केली आहे. या यात्रेला संबोधित करण्यासाठी फडणवीस यांचा ताफा आला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती शर्मिला येवलेने जोरजोरात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने निळ्या शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मध्येच रस्त्यावर फुगा पडून फुटल्याने रस्त्यावर शाई पसरली होती. या तरुणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुखांची भेट

News Desk

एमआयएम ७४ जागांवर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

News Desk

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो !

News Desk