HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो!

मुंबई | काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांनी आज (११ सप्टेंबर) भाजपची मुंबईतील गरवारे क्लब दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रवेश झाला आहे. “हर्षवर्धन यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी येणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थिस्थांना संबोधित करताना बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, इंदापूर तुमचा परिवार आहे, तसाच भारतीय जनता पक्षही एक परिवार आहे. तसाच भाजपही एक परिवार आहे. हा पक्ष एका परिवाराचा नसून पक्षच परिवार असल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष मिळून पूर्वीपेक्षाही अनेक जागा जिंकतील. त्यामध्ये आता इंदापूरच्याही जागेचा समावेश झाला आहे, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी येथून हर्षवर्धन यांनी उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेश सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले

 • हर्षवर्धन यांचा प्रवेश आज भाजपत होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे
 • गेली पाच वर्षे आम्ही वाट पाहत होतो की त्यांनी भाजपात यावे
 • इंदापूर हा हर्षवर्धन यांचा परिवार आहे, तसाच भाजप हा देखील एक पक्ष आहे, हा एका परिवाराचा पक्ष नाही.
 • अनुभवी नेता पक्षात आल्याने पक्षाला बळकटी मिळेल
 • आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा ही हक्काने त्यांच्याकडे जात येत होतं.
 • हर्षवर्धन पाटील हे संयमी व्यक्तिमत्व आहेत. संसदीय कार्य मंत्री असताना सर्वांना सोबत घेईन जाण्याची कसब त्यांच्याकडे आहे. याचा फायदा युतीच्या सरकारला मिळेल.
 • निवडणुकीचा निकाल जनतेच्या मनात ठरला आहे.
 • मोदींजींच्या देशात एक विश्वास निर्माण केला आहे. म्हणून प्रचंड मोठा ओढा भाकपकडे आहे.
 • गेल्या पाच वर्षात सरकार चालवत असताना अनेक अडचणी आल्या, पण जे लोकांचया हिताचा निर्णय आम्ही घेतले.
 • कितीही अडचणीची वेळ आली तरी मोदींजीं सारखा नेता आमच्या मागे आहे.
 • हर्षवर्धन यांनी योग्य निर्णय घेतला आहे. म्हणून येत्या काळात तुमच्या मतदार संघातील मागण्या पूर्ण करण्यासाठी काम करू
 • येणाऱ्या युती सरकारमध्ये आता इंदापुरच्या जागेचाही समावेश झाला आहे हा विश्वास मी व्यक्त करतो

Related posts

राहुल गांधींच्या सभेला दोन्ही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची अनुपस्थिती

News Desk

जाड भरडे पीठ पण दूसऱ्या पक्षात गेले, आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय !

News Desk

बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करणार !

News Desk