HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होणार ?

मुंबई। राज्यभरात गेल्या दहा दिवस गणेशोत्सवामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अनंत चतुर्दशीला मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन पार पडले. यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे राज्यात वेध लागले आहेत. आज (१३ सप्टेंबर) किंवा उद्या ( १४ सप्टेंबर) आचारसंहिता लागण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, राज्यभरात आजपासून ( १३ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद (१४ सप्टेंबर) यात्रा सुरू असल्यामुळे आचारसंहिता उशीरा लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जाते.

तसेच राज्यातील विधानसभा निवडणुका साधारणपणे १५-२० ऑक्टोबरच्या शक्यता आहे. राज्यात उद्यापासून ( १४ सप्टेंबर) पितृपक्षाला सुरुवात होत असल्याने त्याआधीच निवडणुकीची घोषणा करण्यात येईल असेही शक्यता वर्तवली जाते. शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या ही जागा वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाकडून विविध विकासकामांच्या उद्धाटनांचा धडाका लावण्यात आला आहे

 

Related posts

शिवसेना-भाजपच्या यात्रा ‘मुख्यमंत्री’ पदासाठी !

News Desk

शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार, सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार ?

News Desk

झाडे कापल्यानंतर आरेला जंगल घोषित करणार का?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

News Desk