HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

आज राष्ट्रवादी-काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. भाजपची आज (११ सप्टेंबर) तिसरी मेगाभरती सोहळा होणार आहे. हा सोहळा मुंबईच्या गरवारे क्लब दुपारी ३ वाजता होणार आहे. तिसऱ्या मेगा भरतीत राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मेगाभरतीचा सोहळा पार पडणार आहे. मेगाभरतीशिवाय विरोधी पक्षातील अनेक भाजप-शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी नवीन उमेदवार शोधणे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान असणार आहे.

१ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या  उपस्थितीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

Related posts

राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल, तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निवडून द्या !

News Desk

शिवसेनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

अमित शहांचे विमानतळावर स्वागत, कलम ३७० रद्द केल्याबद्दल ३७० तोफांची सलामी

News Desk