HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

उदयनराजे भोसले ५ सप्टेंबरला करणार भाजप प्रवेश

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. अखेर उदयनराजे ५ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर ४ सप्टेंबरला ते त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे. उदयनराजे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोलापूरमध्ये आज (१ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये उदयनराजेंच्या प्रवेशासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणी करणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शनिवारी (३१ ऑगस्ट) उदयनराजेंशी फोनवरून चर्चाही केली असून उदयनराजे जाणार नाहीत, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उदयनराजेंनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती कळते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचितमध्ये फूट, जलील यांच्या घोषणेवर औवेसींचा शिक्कामोर्तब

News Desk

बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही !

News Desk

Rupali Chakankar NCP | असंही ‘त्यांचा’ कार्यकाळ संपणारच होता !

swarit