HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

उदयनराजे भोसलेंना धक्का, सातारा लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर

नवी दिल्ली | राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. मात्र, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुका लांबणीवर पडली आहे. यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक आज (२१ सप्टेंबर) आहे तर देशातील विविध राज्यातील ६४ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुका या निवडणुकीच्या तारखेसोबत होणार आहेत. मात्र सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार असल्याची कोणतीह घोषणा निवडणूक आयोगाने केली नाही.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करताना विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक व्हावी, या अटीवरच उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाले आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना, दिल्लीमध्ये मध्यरात्री २ वाजता, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना राजीनामा सुपूर्त केला होता.

दरम्यान उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांचीही नावे राष्ट्रवादीकडून समोर येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या सर्व्हेमध्ये विधानसभा निवडणुकीत युतीला मिळणार २२९ जागा

News Desk

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणेश नाईक ११ सप्टेंबरला करणार भाजप

News Desk

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी ‘या’ कारणामुळे अनुपस्थित

News Desk