HW News Marathi
महाराष्ट्र

अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या विरुध्द केलेल्या वक्तव्यानंतर मनसे- सेनेत टीका टिप्पणी सुरू

मुंबई | ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनसे अविनाश जाधव यांनी टीका केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मात्र, शिंदे यांनी स्वतः जाधव यांना फार महत्व दिले नसले तरीही शिवसेनेच्या इतर नेत्यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. अशात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे.

“चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा”, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. अविनाश जाधव यांच वक्तव्य इतक झोबंल आहे की ठाण्यातले सगळे उंदीर बाहेर पडून चू चू करत आहेत. जेव्हा इंग्रजी चॅनेल चा संपादक तुमचे रोज कपडे उतरवतो तेव्हा एकाही नेत्याची बोलायची हिम्मत नाही शेपट्या घालुन बसलेत”, असे संदीप देशपांडे म्हणाले.

“एवढं लक्षात ठेवावं चढता सुरज धीरे ढलता है ढल जायेगा”, अशी टीका माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केली आहे. “शिवसेनेचे नेते जे बोलत आहेत तो सत्तेचा माज आहे. हा माज उतरवायची ताकद महाराष्ट्र मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे. अविनाश जाधव यांच्यासोबत सर्व मनसे कार्यकर्ते आहेत”.

मनसे जिल्ह्याप्रमुख अविनाश जाधव यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या नंतर मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका टिपण्णी केली जात आहे. व्हिडिओ बाइट देऊन एका रात्रीत कुणी नेता होत नाही, अशा शब्दांत खासदार राजन विचारे यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले. उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. तुम्ही तुमच्या औकातीत राहा, असा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबईत आधार कार्डसाठी मध्यरात्रीपासून रांगा

swarit

‘बरं झालं रश्मी ठाकरेंना फडणवीसांच्या पत्नीची उपमा नाही दिली, नाहीतर डान्सिंग डॉलची प्रतिमा झाली असती’

Aprna

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका

News Desk