HW News Marathi
महाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना लाख रुपयाचे धनादेश वाटप 

उत्तम बाबळे भोकर :- तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ३ कुटूंबियांना शासनातर्फे दिल्या जाणारे सानुग्रह अर्थ सहाय्य निधीचे १ लाख रुपयाचे धनादेश माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते ८ एप्रिल रोजी भोकर येथे वाटप करण्यात आले आहेत. भोकर तालुक्यात सन २०१५ ते १६ व २०१६ ते १७ या कालावधीत एकूण १७ शेतक-यांनी आत्महत्त्या केल्या.पोलिस तपास व महसूल विभाग पंचनामा अहवालानूसार नांदेड जिल्हाधिकारी यांनी १७ शेतक-यांपैकी १४ शेतक-यांच्या ख-या आत्महत्त्या झाल्याची नोंद घेत शासनास अर्थ सहाय्याचे प्रस्ताव सादर केले.त्यानूसार राज्य शासनाने प्रत्येकी १ लाख रुपये सानुग्रह अर्थ सहाय्य निधी मंजूर केला.त्या निधी धनादेश शेतकरी आत्महत्त्याग्रस्त काही कुटूंबीयांना तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी वाटप केले. १४ पैकी उर्वरीत निधी वंचित शेतकरी आत्महत्त्याग्रस्त कुटूंबातील १) पद्मिनबाई गोविंद पोसलवाड (कोळगाव), २)मायावती गंगाधर काळे (धारजणी), ३) सागरबाई हनुमंत हंगिरगे (थेरबन) या ३ वारसदारांना ८ एप्रिल २०१७ रोजी भोकर पंचायत समिती सभागृहात माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी आ.अमिता (भाभी) अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रत्येकी १ लाख रुपये निधीचे धनादेश तहसिल कार्यालया मार्फत वाटप करण्यात आले यावेळी नांदेड जि.प.अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर,जि.प.समाज कल्याण सभापती शिला निखाते,भोकर उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,तहसिलदार व्यंकटेश मुंडे,नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, जि.प.गटनेते प्रकाश देशमुख भोसीकर,जि.प.सदस्य बाळासाहेब रावणगावकर,मंगाराणी अंबुलगेकर,दिवाकर रेड्डी,सभापती जगदीश पाटील भोसीकर,सभापती झिमाबाई गुलाब चव्हाण,उपसभापती सुर्यकांत बिल्लेवाड,मंडळ अधिकारी महेश वाकडे यांसह आदी जण उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील, संजय राऊतांचा दावा

News Desk

कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्ना दिल्याने संतोष बांगरांनी चक्क व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

Aprna

परळीत धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा दणदणीत विजय

News Desk