HW News Marathi
महाराष्ट्र

आर्थिक लाभ थेट शेतक-यांच्या बँक खात्यात (डीबीटी)  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मी मुख्यमंत्री बोलतोय…’ मध्ये मुख्यमंत्र्यानी साधला जनतेशी संवाद

उत्तम बाबळे

मुंबई, दि.९ : डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरच्या (डीबीटी) माध्यमातून अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. यापुढे शेतक-यांना अवजारे खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय…’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना दिली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय…’ ‘संकल्प शाश्वत शेतीचा’ या विषयावरील हा कार्यक्रम आज सकाळी प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधून शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरे दिली.

ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण प्रश्न मांडताना म्हणाले, अवजार खरेदीबाबत गैरव्यवहार होत असून शेतक-यांना थेट अनुदान मिळाले तर त्यांनी अवजार खरेदी करून खरेदी केलेल्या अवजाराचे बील आणि अवजाराचे छायाचित्र कृषी विभागाकडे ई मेल वर पाठविले तर कृषी विभागाने या बाबीला मान्यता द्यावी. या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक दिवसांपासून अवजारे खरेदी संदर्भात तक्रारी येत होत्या. हेच लक्षात घेवून जानेवारी २०१७ मध्ये डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर च्या संदर्भात निर्णय झाला आहे आणि याबाबतचा शासन निर्णयही निघाला आहे.आता यापुढे शेतक-यांनी अवजारे खरेदी करून अवजारे खरेदीचे बील आणि छायाचित्र अगदी व्हॉटसएप वर पाठवले तरी चालू शकेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण: साक्षीदारांनी दोन्ही आरोपींना ओळखले

Aprna

विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

News Desk

मुंबईच्या पावसाचे दोन बळी, तिघे बेपत्ता

News Desk