HW News Marathi
महाराष्ट्र

आता वाहनांचे आरसी बुक पुन्हा ‘स्मार्ट’

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून वाहनांचे आरसी बुक छापील स्वरूपात देण्यात येत होते. हे कागदी आरसी बुक सांभाळणे वाहन चालकांसाठी त्रासाचे होते. मात्र आता एक सप्टेंबरपासून पुन्हा स्मार्ट आरसी बुक वितरण करण्याची व्यवस्था परिवहन विभागाकडून केली जाणार आहे. विशेष म्हणजे या वेळेस या स्मार्ट कार्डची किंमतही कमी करण्यात आली आहे.

परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत आरटीओंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत आरटीओ कार्यालयात वाहन परवाना वितरित करण्यात येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. वाहनांचे आरसी बुक स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्याचा कंपनीबरोबरचा करार संपला होता. त्यामुळे कागदी स्वरूपात आरसी बुक देण्यात येत होते. मात्र पूर्वीचा ठेका असलेल्या कंपनीबरोबर आता नव्याने करार करून एक सप्टेंबरपासून आरसी बुक स्मार्ट स्वरूपात उपलब्ध केले जाईल, असे आयुक्त गेडाम यांनी सांगितले. मात्र यावेळेस स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. पूर्वी वाहनधारकांकडून स्मार्ट कार्ड आरसीसाठी ३५०रुपये फी आकारली जात होती. आता मात्र दोनशे रुपयांत स्मार्ट आरसी दिले जाईल. यात ठेकेदाराला ५४.७२ रु. तर उर्वरित रक्कम शासनाला जमा होईल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरात भाजपला धक्क्यावर धक्के, ‘या’ मोठ्या नेत्याला झाला कोरोना

News Desk

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

News Desk

जर आपण कवडीमोलाची किंमत नसलेल्या नातवाचं ऐकलं असतं तर…अतुल भातखळकरांचे पवारांना प्रत्युत्तर

News Desk