HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, खुशाल आमची चौकशी करा..

अकलुज | आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, खुशाल आमची चौकशी करा असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासाघाडीच्या नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. आमच्या सरकारचा कारभार अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ होता. आम्ही कुठलेही चुकीचे काम केले नाही,कोणाचेही पैसे बुडवले नाहीत,आम्ही भ्रष्टाचारही केला नाही. सत्ताधारी पक्षाला ज्या काही चौकशा करायच्या असतील त्या त्यांनी जरूर कराव्यात असं थेट आव्हानच त्यांनी महाघाडीच्या सरकारला दिलं.

आज अकलुजमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना चौकशीसंदर्भात विचारले असता त्यांनी आपण अशा चौकशीच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत असताना भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील ,चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

काही दिवसांपुर्वी कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील सरकारने खूप भ्रष्टाचार केला असून त्याची सर्व चौकशी या सरकार कडून केली जाणार असल्याचं सांगितल होतं. त्याच पार्श्वभुमीवर आमची चौकशी करा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल”, नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

Aprna

अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदावर टांगती तलवार?

News Desk

कोरोना रुग्णांची वाढती संख्या; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

Aprna