HW News Marathi
महाराष्ट्र

एससी-एसटी आयोगाचा मोठेगाव दौरा

वाशिम, : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे व सदस्य (विधी) सी. एल. थूल यांनी आज दलित विवाहिता मृत्यू प्रकरणी मोठेगाव (ता. रिसोड) येथील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा करून घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच आजूबाजूच्या इतर नागरिकांशीही चर्चा केली. याप्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी आयोग प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, तहसीलदार अमोल कुंभार आदी उपस्थित होते.

मोठेगाव येथील दलित विवाहित महिला मृत्यू प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष कांबळे व सदस्य न्यायमूर्ती थूल आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृत महिलेचे आई-वडील व मुलांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर घटना घडलेल्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरीकांशीही यावेळी त्यांनी चर्चा करून अधिक माहिती जाणण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती स्वप्ना गोरे यांच्याकडून महिला मृत्यू प्रकरणी सुरु असलेल्या तपासाची स्थिती जाणून घेतली. तसेच तपासामध्ये कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

मृत महिलेचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनीही पोलिसांना तपासात सहकार्य करावे. कोणालाही याप्रकरणाविषयी कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास ती पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन कांबळे व न्यायमूर्ती थूल यांनी उपस्थितांना केले. या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्यासाठी व केस कोर्टात उभी राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग पोलीस प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे सर्वांगीण बाजूने तपास करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद झाल्यानंतर सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणारी तातडीची मदत मृत महिलेच्या कुटुंबियांना मिळाल्याबाबतही आयोगाने यावेळी खात्री केली. सदर महिलेच्या कुटुंबियांना तातडीने एक महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आयोगाने यावेळी प्रशासनाला दिल्या. तसेच येथील दलित वस्तीमध्ये पिण्याचे पाणी, स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने आयोगाला सादर करण्याच्या सूचनाही कांबळे व न्यायमूर्ती थूल यांनी दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निरा डावा-उजवा कालव्याच्या समन्यायी वाटपाचा निर्णय

swarit

पंढरपूर मंगळवेढा फेरनिवडणुकीची मागणी राष्ट्रवादीने केली नाही, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे स्पष्टीकरण!

News Desk

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

News Desk