HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद येथे पासपोर्ट कार्यालयाचे २८ मार्च रोजी उद्घाटन

गतिमान कारभार व सेवेसाठी खासदार निधी उपलब्ध करणार- खा.चंद्रकात खैरे औरंगाबाद शहरात पासपोर्ट कार्यालय व्हावे यासाठी आपण केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले असून येत्या २८ मार्च रोजी छावणी पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेनचे उपनेते खा.चंद्रकांत खैरे यांनी आज १६ मार्च रोजी औरंगाबाद येथे दिली.

छावणी,औरंगाबाद येथील पोस्ट आॅफिस कार्यालयास १६ मार्च रोजी शिवसेनेचे उपनेते खा.चंद्रकांत खैरे यांनी भेट दिली व तेथील चालू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विभागीय पासपोर्ट अधिकारी जयश्री कुलकर्णी, टेक्निकल डायरेक्टर डॉ.आर. के. मिश्रा, पोस्टमास्तर जनरल प्रणव कुमार आदीसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यालयाची पाहणी केल्यानंतर खा.चंद्रकांत खैरे यांनी अशी माहिती दिली की,जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी मुंबई च्या नाहक फे-या माराव्या लागत होत्या.हे कार्यालय सुरु झाल्यानंतर तो त्रास होणार नसून कमीत कमी खर्चात आठ ते दहा दिवसात पोलीस तपासणी झाल्यानंतर लगेचच पासपोर्ट मिळणार आहे. निधीची गरज भासल्यास मी खासदाराच्या स्थानिक विकास कार्याक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देईन व जनतेसाठी आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रशासकिय स्तरावर पाठपुरावा करणार आहे.

यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही खासदार चंद्रकांत खैरे यांना पत्र पाठवून आपल्या हस्ते पासपोर्ट सेवा केद्रांचे उद्घाटन करण्याचे सांगितले असल्याची माहिती देण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

Aprna

माझे पुस्तक वाचल्यानंतर विरोधी पक्षनेता या पदाचे अवमूल्यन झाल्याचे शल्य राहणार नाही – प्रविण दरेकर

News Desk

ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल – अजित पवार

Aprna