HW News Marathi
महाराष्ट्र

कब्रस्थानाच्या दो गज जमीनीसाठी दोघाची दिल्ली पदयात्रा !

पंतप्रधानांना देणार निवेदन !!
:उल्हासनगर- उल्हासनगर येथील मुस्लीम बांधवाना कब्रस्थानासाठी महानगरपालिकेने जागा द्यावी ह्यासाठी उल्हासनगर ते दिल्ली पदयात्रा काढण्यात आले आहे.
दिनांक १४/३/२०१७ ला महानगरपालीकेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हार अर्पण करुन पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. या पदयात्रेत अनिलकुमार सिन्हा व एकलाक शम्मी उल्लाह शेख हे दोघे असुन प्रती दिन १०ते१५ कि.मी. पदयात्रा करुन जमेल त्या ठिकाणी मुक्काम करीत असल्याचे. बशीर शेख व शकील खान यांनी सागितले. उल्हासनगरात जवळपास दिड ते दोन लाख मुस्लिम समाजाची लोकसंख्या असुन अद्याप पर्यंत राज्य शासन , महानगरपालिकेने मुस्लीम समुदायास कब्रस्थानासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने अनिलकुमार सिन्हा व एकलाक शेख यांनी पदयात्रेद्रारे थेट दिल्ली गाठुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
उल्हासनगर नगरपालीका , नगरपालीकेनंतर महानगरपालिका झाली नगरपालीका ते महानगरपालीका ह्या दरम्यान जिल्हा अधिकारी, प्रात अधिकारी., तसेच राज्य शासनाकडे अनेक वेळा मुस्लिम संघटनेने कंब्रस्थान.”दो गज जमीन” मिळावे म्हणून पत्र व्यवहार तसेच सामाजिक संघर्ष ही केला.या.संघर्षाला दाद न मिळाल्याने अखेर ट्रस्टीच्या संचालक मंडळ बशीर शेख, मोहम्मद अली खान, फरीद शेख, अपसार अहमद शेख, वाली अहमद शेख, शकील शेख, बशीर शेख, मौल्लाना , मजहर रसिद शहा याच्या मार्गदर्शानानुसार अनिलकुमार सिन्हा व एकलाक शेख यांना पदयात्रेद्रारे दिल्लाला रवाना केले. तत्पुर्वी कंब्रस्थानासाठी जागा मिळावी म्हणुन राज्याचे गहमंत्री , नगरविकास सचिव., पोलीस महासंचालक , राज्यपाल, जिल्हाधिकारी , प्रातं याना पदयात्रेचे लेखी निवेदन दिले आहे.
१४/३/२०१७ रोजी पदयात्रेस.प्रारंभ करणारे अनिलकुमार सिन्हा व एकलाक शेख यांचा हल्ली मुक्काम गुजरात मधील जिल्हा नाडीयाड, कापडगंज या ठिकाणी आहे .उन्हाची लाही-लाही होत असताना हे दोन पदयात्रेकरु” दो गज जमीन ” कंब्रस्थान मिळावे म्हणून दिल्ली गाठीत आहे शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्याय देतील का?
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांचा अर्जुन खोतकर यांच्यावर पुन्हा हल्लाबोल!

News Desk

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

“शिंदे-फडणवीसांनी हा महाराष्ट्रद्रोह थांबवावा”, नाना पटोलेंची टीका

Aprna