HW News Marathi
महाराष्ट्र

कामचुकार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री योगींचा थेट सरप्राईज कॉल

लखनऊ – प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवीन शक्कल लढवली आहे. अधिकाऱ्यांना थेट त्यांच्या कार्यालयातील लँडलाईनवर मुख्यमंत्री योगी स्वतः फोन करून त्यांच्या उपस्थितीबाबतची माहिती घेणार आहेत. योगींच्या या नव्या शक्कलीमुळं अनेक कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री योगी हा सरप्राईज कॉल करू शकतात.

उत्तरप्रदेशचे ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांनी या सरप्राईज कॉलला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सरप्राईज कॉलच्यावेळी संबंधित अधिकारी आपल्या कक्षात उपस्थित नसेल आणि त्यासंदर्भात समाधानकारक उत्तरं न दिल्यास त्यांना दंड करण्यात येणार असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं. ज्या अधिकाऱ्यांना ऑफिसबाहेरची कामं सोपवण्यात आली आहेत, त्यांना या सरप्राईज कॉलमधून सुट देण्यात आलेली आहे. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहिल्यास त्याचं अनुकरण कनिष्ठ करतील, अशी भावना या सरप्राईज कॉलमागे असल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केलं.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी असलेली कार्यालयं तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 18-20 तास काम करण्याची तयारी असणाऱ्यांनीच शासकीय नोकरीत राहावं, अन्यथा दुसरा पर्याय निवडावा, असं आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रं स्विकारल्यावर स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय कामकाजात अनेक बदल करायला सुरूवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

swarit

‘केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’ – नवाब मलिक

News Desk

ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करत लोकार्पण! – गोपीचंद पडळकर

Aprna