HW News Marathi
महाराष्ट्र

कारागृहात मसाज, फेशियल, पेडिक्‍युअर सुविधा प्रकरणी इंद्राणी मुखर्जीची चौकशी होणार

मुंबई, मंजुळा शेट्ये यांच्‍या मृतदेहावर जखमा नव्‍हत्‍या असा पहिला खोटा अहवाल देणा-या जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्‍टर चौकशी करण्‍यात येईल तसेच इंद्राणी मुखर्जी या कारागृहात मसाज, पेडिक्‍युअर, फेशियल अशा सुविध मिळत होत्‍या त्‍यामध्‍ये मंजुळा शेट्ये यांचा काही सहभाग होता का ? या प्रकरणीही चौकशी करण्‍यात येईल अशी ग्‍वाही गृह राज्‍य मंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
मंजुळा शेट्ये मृत्‍यू प्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सुचना उपस्थित करण्‍यात आली होती. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंजुळा शेट्ये यांच्‍या मृतदेहावर कोणतीही जखमा नव्‍हत्‍या असा खोटा अहवाल जे जे. रुग्‍णलयातील कॅज्‍युलटी विभागाच्‍या डॉक्‍टरने दिला होता, त्‍याची चौकशी करून कारवाई करण्‍याची मागणी केली. ती गृह राज्‍यमंत्र्यांनी मान्‍य केली. याच चर्चेत पुढे आमदार अॅड आशिष शेलार यांनी एक धक्‍कादायक माहिती सभागृहासमोर आणली. ऑर्थर रोड कारागृहातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनीही या प्रकरणी न्‍यायातयाल प्रतिज्ञापत्र सादर केले असून या इंद्राणी मुखर्जी या कारागृहात मसाज, पेडिक्‍युअर, फेशियल अशा सुविधा घेत होत्‍या. त्‍यामध्‍ये मंजुळा शेट्ये त्‍यांना मदत करत होती. त्‍यामुळे ही बाब सुध्‍दा गंभीर असून त्‍यांचीही चौकशी करण्‍यात यावी अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. या प्रकरणीही तात्‍काळ चौकशी करण्‍याचे गृहराज्‍य मंत्र्यांनी मान्‍य केले. तसेच या प्रकरणी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयावरही कारवाई करण्‍याचे गृहराज्‍य मंत्र्यांनी यावेळी मान्‍य केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारक ठरणार जगातील सर्वात उंच स्मारक

swarit

निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढणाऱ्या रत्नागिरीच्या उमेदवारवर गुन्हा दाखल

News Desk

हताश, थकलेल्या लोकांची देशाला गरज नाही !

News Desk