HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या, उद्धव ठाकरेंचं सरकारला आवाहन

औरंगाबाद – मध्यावधीच्या निवडणुकीचा जितका खर्च होणार आहे, तितके पैसे शेतकऱ्यांना द्या. 40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी मला पाहिजे, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलंय. समृद्धी महामार्गासाठी सरकारनं आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नये, असा धमकीवजा इशाराही ठाकरे यांनी दिलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव बोलत होते.

जे कर्जमुक्तीचं होतंय तेच समृद्धी महामार्गचं होणार आहे. तुमची कागदावरची रेषा ही शेतकऱ्यांच्या आयुष्याची रेषा संपवेल. समृद्धी महामार्गापेक्षा आधी जो मार्ग आहे, तो रुंद करा. ‘समृद्धी’साठी सरकारनं आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

राज्यातला शेतकरी खरंच कर्जमुक्त होतोय का हे पाहण्यासाठी मी फिरतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. कर्जमुक्ती आम्हीच केले हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. ज्यांनी शेतकऱ्यांची हेटाळणी केली, तेच कर्जमुक्ती आम्ही केली म्हणून होर्डिंग लावत आहेत, असा टोला ठाकरे यांनी सरकारला लगावला.

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कोणीही नव्हते, मात्र महाराष्ट्रात शिवसेनेची साथ आहे. कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला हे सगळ्या शेतकऱ्यांना पारदर्शक कळले पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गॅसची सबसिडी किती लोकांनी नाकारली हे तपासत आहे. गॅस सबसिडी नाकारणारे 2 कोटी कुठे आहेत? तसेच शेतकऱ्यांचे होईल. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी बँकेच्या बाहेर लावा. जे कर्जवसुलीसाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या समोर ढोल लावत होते, त्यांना आता सांगा. सगळं पारदर्शक मला कळले पाहिजे, हे जर होत नसेल तर हा भंपकपणा आहे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर मी भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करीन” – गुलाबराव पाटील

News Desk

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

जलयुक्त शिवारची एसआयटी मार्फत  चौकशी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk