HW News Marathi
महाराष्ट्र

खडकवासला ओव्हरफ्लोल, उजनीचा साठा वाढणार

पुणेः जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणाचा साठा वाढल्याने खडकवासला धरणातून ९००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर आला आहे. नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण पूर्ण भरले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडल्यास सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या साठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी रात्री खडकवासलातून पाणी सोडण्यात आले. रात्री पावसाचा जोर वाढल्याने पाणी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आले. सध्या दहा हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संभाजीनगर नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास शिंदेंची मान्यता

Manasi Devkar

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

News Desk

दत्ता ईस्वलकर यांचं निधन, गिरणी कामगारांच्या हक्काचा आवाज हरपला

News Desk
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

राफेलची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत | महाधिवक्ता

News Desk

उत्तर भारतात धुळीचे वादळ धडकले

News Desk

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना DCGIची मंजुरी

News Desk