HW News Marathi
महाराष्ट्र

खंडाळ्यात एक्स्प्रेसवर दरड कोसळली

मुंबई – पुणे – मुंबई मार्गे येणाऱ्या हुबळी एक्स्प्रेसवर सोमवारी पहाटे दरड कोसळून तीन प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेमुळे हुबळी एक्स्प्रेस सुमारे तासभर कोळंबली होती.

ही एक्स्प्रेस पुण्याहून मुंबईकडे येत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास खंडाळा घाटात पोहोचली. येथील मंकी हिल पॉइंटजवळून पुढे सरकत असताना अचानक भूस्खलन होऊनएक्स्प्रेसवर दरड कोसळली. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. दरडीचे दगड येथे रेल्वेगाडीच्या आत आले. यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

हा भाग प्रवासासाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. मंकी हिल परिसरातयापूर्वीही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी १८ जुलै रोजी दरड कोसळून मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले होते.तसेच दुसऱ्याच दिवशी सह्याद्री एक्स्प्रेसही दरड कोसळली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गजानन मारणेचं साम्राज्य उध्वस्त करणार ,पुणे पोलिसांनी ललकारलं…!

News Desk

“…तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पेटवायचा ‘तो’डाव होता”- यशोमती ठाकूर

News Desk

शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

News Desk