HW News Marathi
महाराष्ट्र

गटारीसाठी बक-यांची विक्रमी विक्री

कल्याण : कल्याण-भिवंडी रोडवरील दुगार्डी पुला नजीक असलेली कोन गावातील बकरी मंडई ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बकरी मंडई आहे. या मंडईत मुंबई, ठाणे, आणि ग्रामीण परिसरातील मटन विक्रेत्यांनी गटारीच्या पार्श्वभूमीवर बकरे खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. मात्र यंदा पावसामुळे बक-यांची आवक घटली आहे.

यंदा गटारी अमावस्या रविवारी आल्याने गटारी साजरी करणा-यामध्ये अधिकच उत्साह आहे. कल्याण-भिवंडी रोडला असलेल्या कोनगावच्या बकरी मंडईत आठवड्यातून तीन दिवस हा बकरी बाजार भरत असते. रविवारी गटारी आल्याने शनिवारी बाजाराचा आठवड्यातील शेवटचा दिवस होता. त्यामुळे बकरे आणि मेंढी घेऊन बकरी विक्रेते भारताच्या विविध राज्यातून याठिकाणी आले होते. या बकरी मंडईत, सुमारे ७ हजार बकरे आणि मेंढ्या व्यापा-यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. पावसामुळे यंदा बक-यांची आवक घटली असून हीच आवक गेल्या वर्षी १२ हजार बक-यांची होती. यंदा त्यात घट झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधींचे मारेकरी जिवंत, कालीचरण महाराजांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

Aprna

नवाब मलिकांना दिलासा; खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

Manasi Devkar

राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना उच्च न्यायालयाकडून धक्का

Gauri Tilekar